ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 जानेवारी : पाचोरा शहरातून एक दुःखद घटना समोर आली आहे. पाचोरा शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच आशीर्वाद बिल्डर्सचे संचालक मुकुंद (अण्णा) वामन बिल्दिकर यांचे निधन झाले. आज मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला.
आज पाचोऱ्यात अंत्यसंस्कार –
व्यावसायिक मुकुंद बिल्दिकर हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. लवकरच त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्रक्रिया होणार होती. मात्र, त्याआधीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथून शवविच्छेदनानंतर आज पाचोरा येथे पोहोचणार आहे. यानंतर संध्याकाळी अंत्यसंकार केले जाणार आहेत.
मुकुंद बिल्दिकर यांनी अगदी कमी वेळेत तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक मिळविला होता. तसेच मोठा जनसंपर्क त्यांनी कमावला होता. त्यांच्या निधनामुळे पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : विद्या पाटील यांनी तालुक्याचा लौकीक वाढविला; वैशाली सुर्यवंशी यांचे प्रतिपादन