• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 6, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव, 6 जून: येत्या खरीप हंगामात ‘अल नीनो’च्या संभाव्य प्रभावामुळे हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता योग्य नियोजन करावे तसेच बदलत्या हवामान परिस्थितीत पिकांचे संरक्षण आणि उत्पादनवाढीसाठी ‘ब्रॉड बेड फरो (बीबीएफ)’ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, ‘आत्मा’ जळगाव व कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म येथे आयोजित ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रम तसेच ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब, खतांचा संतुलित वापर आणि मातीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कमी किंवा अतिवृष्टीच्या परिस्थितीतही पिकांचे संरक्षण करणारे बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी माती परीक्षणाचे महत्त्व विशद करताना शेतकऱ्यांनी जमिनीच्या गरजेनुसारच खतांचा वापर करावा, असे सांगितले. पहिल्या पावसानंतर तातडीने पेरणी न करता जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी व डॉ. शरद जाधव यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पिक व खत पेरणी तसेच टोकण यंत्राद्वारे पेरणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. या तंत्रज्ञानामुळे बियाणे व खतांची बचत, ओलावा संवर्धन तसेच उत्पादनवाढीचे फायदे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ यंत्राद्वारे सरी-वरंबा पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच महिला शेतकरी व शेतमजुरांचे श्रम कमी करण्यासाठी टोकण यंत्राचा प्रभावी वापर कसा करता येईल, याची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून इतर शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रेरणा देणाऱ्या मनोज चौधरी (मुमराबाद), हितेंद्र महाजन (म्हसावद), राजेंद्र पाटील (पिचर्डे) व सुनील बोरसे (चोपडा) या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहात, डॉ. सुमेरसिंग राजपूत, डॉ. गिरीश चौधरी, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) भरत इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, दीपक साळुंखे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शरद जाधव, किरण जाधव, तुषार गोरे, किरण मांडोळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, महिला शेतकरी व कृषी सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प उपसंचालक (आत्मा) भरत इंगळे यांनी केले.

हेही वाचा: VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer-scientist interaction programjalgaon newskhet bachao abhiyanKVK mamurabad farmpre-kharif season preparationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page