सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 6 मे : राज्यात गेल्या महिनाभरापासून उन्हाचा पारा वाढला असून उष्माघाताच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असताना पारोळा तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पारोळा तालुक्यात करमाड येथील शेतकरी अर्जुन भगवान पाटील ( वय 68) यांचा उष्माघातामुळे चक्कर येऊन पडल्याने शेताच्या बांधावरच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली.
शेतकरी अर्जुन पाटील हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे करमाड शिवारातील आपल्या शेतात गेले होते. तिथे बांधावर काम करीत असताना त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना लागलीच पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रवींद्र भगवान पाटील (50) यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर