ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 जुलै : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य महासचिव डॉ. विश्वास राव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने गजानन लादे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंगच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार नितीन पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, खान्देश विभागीय संपर्कप्रमुख राकेश सुतार, जनशक्ती तालुका प्रतिनिधी विजु पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, यांच्या सर्वांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी गजानन लाधे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची काल बैठक संपन्न झाली. यावेळी नूतन ग्रामीण कार्यकरणी जाहीर करण्यात आली. यावेळी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून त्यांना शुभेछा देण्यात आल्या.
हेही वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: आधी कागदपत्रांची पुर्तता करा अन् अर्ज दाखल करा, प्रशासनाचे आवाहन