पेन्सिलव्हॅनिया (अमेरिका), 14 जुलै : यंदाच्या वर्षअखेर अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तथा आगामी निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅली सुरू आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारादरम्यान ड्रम्प यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून या गोळीबारात ट्रम्प हे जखमी झाल्याचे समजते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला? –
अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया राज्यात डोनाल्ड ट्रम्प रॅलीला संबोधित करत असताना अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारादरम्यान यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या गोळीबारात एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागून गेली. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. दरम्यान, या घटनेने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प किरकोळ जखमी –
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेन्सिलव्हॅनिया येथील एका सभेत गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. त्यांच्या डाव्या कानाला बंदुकीची गोळी लागून गेली. या घटनेचे काही व्हिडीओ देखील आता समोर आले आहेत. यामध्ये त्यांच्या कानाला जखम झाल्याचे दिसते. दरम्यान, सध्या डोनाल्ड ट्रम्प सुखरुप असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे.
हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार