मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेर आता महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पालकमंत्री जाहीर झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पालकमंत्री पदाच्या यादीत नाही. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडें यांना पहिला मोठा धक्का बसला आहे.
यामध्ये गडचिरोलीचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: कडे ठेवलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई या दोन शहरांचे पालकमंत्री असतील. तसेच अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले असून यासोबतच अजित दादांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा देण्यात आले आहे.
सध्या राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. गेल्या वेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते.
मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. अखेर त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आले आहे. यानंतर आता बीडचे नवे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत. बीडसोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचेदेखील पालकमंत्रीपद असणार आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जळगावात कोणाला मिळाली संधी?, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर