चोपडा, 22 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून गुटखा जप्तीची मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन लाख 28 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी सुपारी जप्त करत करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील सेंधव्यावरून अमळेरकडे जाणाऱ्या पीकअपमधून गुटखा तस्करी होत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली होती. दरम्यान, चोपडा पोलिसांनी चोपडा-शिरपूर रस्त्यावर कारवाईसाठी सापळा रचला. या कारवाईत त्यांना पांढर्या रंगाची बोलेरो पिकअपमधून (एम.एच.03 सी.पी.2497) गुटखा व सुंगधी सुपारीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांनी 1 लाख 94 हजार 480 रुपये किंमतीचा विमल पानमसाला व 34 हजार 320 रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू जप्त केली. तसेच साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून एकूण सहा लाख 78 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात गाडी चालक प्रशांत माणकू भिल (रा. हेफयवाडी ता. जि. धुळे) याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय शेषराव नितनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यात गाडी चालक प्रशांत माणकू भिल रा. हेफयवाडी ता. जि. धुळे याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी 52 लाखांचा गुटखा पकडल्याची घटना समोर आली होती. चोपडा तालुक्यातील गुटखा पकडल्याची ही सर्वात मोठी कारवाई होती.
हेही वाचा : Raksha Khadse : ‘नाथाभाऊंनी भाजपमध्ये यावं,’ खासदार रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?