• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Rain Update: मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 2, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Rain Update: मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

जळगाव, 2 ऑगस्ट: राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

जळगाव जिल्ह्याचा पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज –

2 जुलै (बुधवार) रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

3 जुलै रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात.

4, 5 आणि 6 जुलै या तीन दिवसांतही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून जिल्ह्यात विविध भागांत पावसाच्या किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात काही प्रमाणात गारवा जाणवेल.

दरम्यान, राज्यातील इतर भागांतही पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट कायम –

यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावत जिल्हावासीयांची चांगलीच प्रतीक्षा पाहिली. मात्र, ३० जूनअखेरपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी काहीसा दिलासादायक चित्र समोर आले आहे. जून महिन्यात अधिकृत नोंदीनुसार अवघ्या सात दिवस पावसाची नोंद झाली असली, तरी या सात दिवसांतच जून महिन्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तब्बल ६८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा कालावधी कमी असला तरी समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तथापि, जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे.

पालघर आणि रायगडमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी – 

कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसचे रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा: कृषी दिन विशेष: तरुणांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत – ‘आपला बळीराजा’

बातमी शेअर करा !
Share
Tags: heavy rainimdjalgaon weather forecastmarathi newsrain expectedrain updatesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page