संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 16 जून : पारोळा शहरात गेल्या अनेक काळापासून सुरु असलेला वारंवार विजेचा लपंडाव याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पारोळा शहर यापूर्वीच अनेक समस्यांना तोंड देत असून यात महावितरण मोठी भर घालत असल्याने नागरिकांचे जीवन हैराण झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, महावितरणाच्या कारभारासंदर्भात डॉ संभाजीराजे पाटील यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. शहरात विजेचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशा आशयाच्या मागणीचे निवदेन दिले आहे.
पारोळ्यात वीज पुरवठा सुरळीत नसण्याची आहे तक्रार –
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, पारोळा शहरात वारंवार खंडित होण्याची समस्या ही कायमची आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या समस्या वाढतच आहे. दिवस आणि रात्र याचे कोणतेही वेळ न बघता कोणत्याही पूर्वसूचनाविना, 5 ते 10 मिनिटांचे दिवसातून आठ ते नऊ वेळा, आणि बऱ्याचदा तासाभराचे सुद्धा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो.
वीजेची समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा –
वीजेच्या समस्येने शहरातील नागरीक हे प्रचंड त्रस्त असून व्यापारी, उद्योग, शासकीय कामकाज, विद्यार्थी, पाणी पुरवठा, सलून कामगार, रसवंती कोल्ड्रिंक त्याचबरोबर वैद्यकीय सेवांवर याचा परिणाम होत आहे. महावितरणाने वेळीच लक्ष न दिल्यास संपुर्ण शहरवासीयांना सोबत घेऊन आंदोलन पुकारण्यात येईल आणि या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांना महावितरण संपुर्णता: महावितरण जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते डॉ. संभाजीराजे पाटील यांच्याकडून देण्यात आला. निवदेन देताना राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. महेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास, काय महामंडळाची विशेष मोहीम?