मुंबई, 19 मार्च : नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून जिल्ह्यात रोजगार नाहीये. यामुळे सुशिक्षित तसेच कुशल-अकुशल बेरोजगारांचे रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होत आहे. यामुळे मतदारसंघात दारिद्र, कुपोषण, बेरोजगारी, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या असून जनतेत शासनाविषयी उदासीनता दिसून येत आहे. यामुळे शहादा तळोदा मतदारसंघात लवकरच एमआयडीसी व्हावी, अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
आमदार राजेश पाडवी काय म्हणाले? –
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. दरम्यान, आज विधानसभेत आज शहादा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पाडवी यांनी लक्षवेधी मांडली. आमदार पाडवी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यात एकही मोठा उद्योग धंदा आला नाही. त्यामुळे मोठा रोजगाराचा प्रश्न या भागांमध्ये गंभीर होत चाललेला आहे. कुशल आणि अकुशल तरुणांना मोठ्या शहरात जाऊन काम करावे लागत असल्याची परिस्थिती या भागांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, दोन राज्यांच्या सीमावरती असलेला शहादा तळोदा मतदार संघात रोजगार निर्मितीची गरज आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदार संघ हा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेला लागून असलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघात दळणवळणाची उत्तम सोय असली तरी आजपर्यंत या ठिकाणी उद्योग धंदे सुरू सुरू झालेल्या नसल्याचे आमदार राजेश पाडवी पुढे म्हणाले.
शहादा तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र –
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक बागायती क्षेत्र हा शहादा आणि तळोदा मतदार संघात असून या भागात मोठ्या प्रमाणात केळी पपई, मिरची,आमचूर ,सोयाबीन, हरभरा इत्यादी पीक घेतली जात असतात. मात्र, या सगळ्या शेतातून निघणाऱ्या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रोसेसिंग युनिट तयार करण्याची मागणी देखील आमदार पाडवी यांनी सरकारकडे केली.
शहादा तळोदा मतदारसंघात एमआयडीसीसाठी उपयुक्त जागा आहे. या सोबतच पाण्याची योग्य सोय आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेला हे दोघ तालुके असल्यामुळे या ठिकाणी दळणवळणाची सुविधा देखील सुरळीत आहे. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी ही 100% यशस्वी होऊ शकते, अशी विश्वास आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केला.
आमदार पाडवींच्या मागणबाबत उद्योगमंत्री उदय सामंत काय म्हणाले? –
आमदार राजेश पाडवी यांनी मतदारसंघातील उद्योग धंद्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मंत्री सामंत म्हणाले की, शहादा तळोदा मतदारसंघात एमआयडीसी साठी आम्ही प्रयत्नशील असून त्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. शहादा एमआयडीसी संदर्भात उद्योग विभागा अंतर्गत बैठकी पूर्ण झाली आहे. शहादा येथे एमआयडीसी उभारण्यासाठी निर्णय झालेला असून तातडीने एमआयडीसी उभारण्यासंदर्भातील कामांना मंजुरी देण्यात आलेली आली आहे. यासोबतच नंदुरबार जिल्ह्यात नव्याने 1 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प देखील लवकरच नंदुरबार मध्ये सुरू आहे.
शहाद्यात लवकरच 100% एमआयडीसी पूर्ण केली जाणार – उद्योगमंत्री उदय सामंत
मंत्री सामंत म्हणाले की, शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातून मांडलेला हा प्रश्न गंभीर आहे. यामुळे सरकार या विषयाला गांभीर्यपूर्वक घेत असून शहाद्यात लवकरच एमआयडीसी तयार करण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने काम देखील सुरू झालेला आहे शहाद्यात लवकरच 100% एमआयडीसी पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना रोजगारासाठी इतर जिल्ह्यात आणि राज्य स्थलांतरण व्हावे लागणार नाहीये. दरम्यान, यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा : Special Story : जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन CEO, कोण आहेत IAS मीनल करनवाल?