• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home

स्वच्छता, घरकुल व कर वसूलीबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अमळनेर नगरपालिकेला महत्वाच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 25, 2023
in जळगाव जिल्हा
स्वच्छता, घरकुल व कर वसूलीबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अमळनेर नगरपालिकेला महत्वाच्या सूचना

जळगाव, 25 सप्टेंबर : अमळनेर नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यास वाव आहे. नगरपालिकेने स्वच्छता, घरकुल व कर वसूली मध्ये झोकून देऊन काम करून अपेक्षित रिझल्ट द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

अमळनेर नगरपालिकेच्या विविध कामकाजाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला,‌ त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर, प्रांताधिकारी महादेव खेडकर, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड आदी अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अमळनेर स्वच्छ व सुंदर करण्यास प्राधान्य द्यावे. शहराच्या विकासासाठी काम करण्यास चांगला वाव‌ आहे. स्वच्छतेसाठी घंटागाडीचा मार्ग ठरवून देण्यात यावा‌. आठवड्यातून तीन दिवस मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः शहराची चकर मारावी.

घंटागाडीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात यावा. खासगी मालमत्तेवर कचरा टाकण्यात येत असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी. माझी वंसुधरा व स्वच्छ शहर हे दोन्ही अभियान एकत्र राबविण्यात यावे. या अभियान स्पर्धेत अमळनेर नगरपालिकेच्या यावर्षी रॅंक मध्ये सुधारणा झाली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

स्वच्छता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, सोसायटीचे नागरिक, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांचा लोक सहभाग वाढविण्यात यावा. समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घ्यावे गावागावी स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे. शहर धुळमुक्त होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, नगरपालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारामती व खोपोली नगरपालिकेचा अभ्यास दौरा करावा. ३१ ऑक्टओंबर पर्यंत साडेबारा कोटींची थकीत करवसूली शंभर टक्के झाली पाहिजे. कॅशलेस वसूली वर भर दिला पाहिजे. यासाठी नोटीसा देण्यात याव्यात. आपल्या स्तरावर लोक अदालत आयोजित करून तक्रारींची निपटारा करण्यात यावा.

तसेच ३१ डिसेंबर पर्यंत जिल्हा नियोजनाची मंजूर व घरकुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत. एकाच वेळेस एका ठेकेदाराला काम देऊ नका. सर्व सामान्य जनतेशी संवाद ठेवण्यात यावा. शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलपूर्नरभरण व रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner municipalityamalner newsias ayush prasad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page