• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्यांसंदर्भात बैठक; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले महत्वाचे आदेश

रेल्वे आत्महत्यांवर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 22, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्यांसंदर्भात बैठक; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले महत्वाचे आदेश

जळगाव, 22 सप्टेंबर : रेल्वे क्रॉसिंग व ट्रॅकवर आत्महत्या सारख्या घटना नियमित घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्यांसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत केल्या.

काय म्हणाले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद? –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंग करतांना तसेच रेल्वेच्या क्षेत्रात आत्महत्येच्या घटना‌ नियमित घडत असतात. या घटनांवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी रेल्वे प्रशासनाने आत्महत्या प्रवण क्षेत्रांचा शोध घेऊन त्याठिकाणी कंपाउंड वॉलचे बांधकाम करावे. तसेच सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. रेल्वे पोलीसांची दैनंदिन गस्त वाढविण्यात यावी.

जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना –
महानगरपालिका व आरोग्य विभागाने संयुक्त विद्यमाने आत्महत्येपासून परावृत करण्यासाठी समूपदेशन शिबिरांचे आयोजन करावे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. रेल्वे व आरोग्य प्रशासनाने हेल्पलाईन प्रसिद्ध करावी. हेल्पलाईन क्रमांक सर्वसामान्यांना ठळकपणे दिसून येईल. अशा ठिकाणी प्रदर्शित करण्यात यावा. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्यांसंदर्भात बैठक –
रेल्वे परिसरात होणाऱ्या आत्महत्येवर करावयाच्या उपाययोजनासाठी भुसावळ रेल्वे प्रबंधक व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते‌. या‌ बैठकीला मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय ,आमदार सुरेश भोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, विभागीय परिचालन प्रबंधक योगेश पाटील, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते

आत्महत्येंसदर्भात प्रशासन संवेदनशील –
रेल्वे व्यवस्थापक श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, रेल्वे प्रशासनाने आत्महत्या प्रवण क्षेत्रांचा शोध घेतला आहे. याविषयावर रेल्वे व जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

येथे अपघाताच्या नियमित घटना –
जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे म्हणाले की, जळगाव -शिरसोली सेक्शन मध्ये प्रभू देसाई नगर,बजरंग बोगदा, गणेश कॉलनी, प्रेम नगर, प्रिंप्राला, खंडेराव नगर, शिव कॉलनी, आशाबाबा नगर, हरिविठ्ठाल नगर हे भागात आत्महत्या व इतर रेल्वे अपघाताच्या घटना नियमित घडत असतात, यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

हेल्पलाईन जाहीर –
या बैठकीत आरोग्य प्रशासनाने नागरिकांच्या समूपदेशनासाठी हेल्पलाईन जाहीर केली. व्यसन , परीक्षेचा ताण, आंतर वैयक्तिक समस्या, बेचैनी , घबराहट, उदासिनता, आत्महत्येचा विचार यांसारख्या समस्यांसाठी टोल फ्री क्रमांक 14416/1800-89-8914416 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgaon newssuicides on railway tracks

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, ‘या’ विभागाचा आयुक्तपदाचा पदभार तात्काळ स्वीकारण्याचे आदेश

तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, ‘या’ विभागाचा आयुक्तपदाचा पदभार तात्काळ स्वीकारण्याचे आदेश

May 19, 2026
पिंपरखेड येथील जनाताई भोसले यांचे निधन; ॲड. विश्वासराव भोसले यांना मातृशोक

पिंपरखेड येथील जनाताई भोसले यांचे निधन; ॲड. विश्वासराव भोसले यांना मातृशोक

May 19, 2026
विधानपरिषद निवडणुकीची घोषणा अन् कर्जमाफीबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार?

विधानपरिषद निवडणुकीची घोषणा अन् कर्जमाफीबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार?

May 19, 2026
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा; जळगाव जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपधारक तसेच नागरिकांना महत्वाच्या सूचना

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा; जळगाव जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपधारक तसेच नागरिकांना महत्वाच्या सूचना

May 19, 2026
पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश

पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश

May 19, 2026
नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

May 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page