• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 8, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगाव, 8 ऑगस्ट: शहरातील भवानीपेठ परिसरातील दुकानातून चोरीला गेलेल्या तीन वेल्डिंग मशिन आणि 16 ग्राईंडर मशिनच्या बॉक्सच्या चोरीचा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे 52 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

भवानीपेठ येथील नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशन या दुकानातून 3 ऑगस्ट रोजी तीन वेल्डिंग मशिनचे बॉक्स आणि 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी 6 ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 162/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी हाती घेतला. त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह दुकानातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वसिम शेख हसन (वय 29, रा. मरिमाता मंदिराजवळ, भिरपुला, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरी केल्याची कबुली मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तीन वेल्डिंग मशिनचे बॉक्स आणि 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स, असा एकूण 52,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे तसेच पोलीस अंमलदार योगेश जाधव, विजय खैरे, अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजित चौधरी, गणेश ढाकणे आणि योगेश साबळे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon policemarathi newspachora newsshanipeth police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page