• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार ‘महासंस्कृती महोत्सव’, 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 23, 2024
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा
जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार ‘महासंस्कृती महोत्सव’, 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

जळगाव, 23 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच खान्देशमधील स्थानिक कलाकारांना‌ या महोत्सवात व्यासपीठ मिळावे, यासाठी स्थानिक‌‌ लोक कलाकारांना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे, अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.‌

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात‌ फेब्रुवारी 2024 या महिन्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या‌ महोत्सवाच्या नियोजनाची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.‌  याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महा संस्कृती’ महोत्सवात आयोजित करावयाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, नागरिकांना सोयीचे ठरतील अशा मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या 15 ते 19 फेब्रुवारी २०२४ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे.‌ चला हवा येवू द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, सारेगमप, इंडियन आयडॉल मधील कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी करावी. महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नीटनेटके व यशस्वी होण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा नियोजनाच्या कामांचा आढावा – 

यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील मंजूर कामे व प्रलंबित कामांचा आढावा ही पालकमंत्र्यांनी घेतला. आचारसंहितेपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने कामांना गती देण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

मराठा समाज व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षण आढावा

शासनाच्या वतीने आजपासून सुरू असलेल्या मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षणाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचे पालकमंत्र्यांपुढे सादरीकरण केले.  सर्वेक्षणात कोणताही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी सर्वेक्षणात सहभागी सर्वेक्षक, प्रगणक व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महावितरणच्या कामांचा आढावा –

जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून महावितरण विभागाला देण्यात आलेल्या निधीतून सब-स्टेशन, फिडरच्या कामांना गती देण्यात यावी. कोणत्याही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी‌. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patiljalagaon mahaculture festival 2024jalgaon mahasankriti mahotsav

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

May 28, 2026
ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 28, 2026
मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

May 27, 2026
कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

May 27, 2026
अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

May 27, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

May 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page