जालना, 21 फेब्रुवारी : राज्य सराकरने विशेष अधिवेशात मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षणवार मनोज जरांगे सहमत नसून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे स्पष्ठ केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारला आंदोलनाबाबत गंभीर इशारा दिला आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले.
काय म्हणाले मनोज जरांगे? –
मनोज जरांगे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, सरकारने दिलेले आरक्षण आरक्षण अमान्य आहे. सरकारने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण दिले पाहिजे, आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे गावे घेतले पाहिजेत. सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी दोन दिवसांत करा, अन्यथा 24 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
राज्यभर रास्ता रोको आंदोलन –
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरली आहे. मनोज जरांगे पाटील याने पत्रकार परिषद घेत मराठ्यांना आंदोलनाची दिशा दिली. मराठा बांधवांनी 24 तारखेपासून रोज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करा तसेच वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावे. दरम्यान, उपोषणावेळी एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाला तर त्याला सरकारच जबाबदार असणार, असा गंभीर इशार जरांगे यांनी दिला.
गुणरत्न सदावर्तेंची जरांगेंवर टीका –
मनोज जरांगे पाटील हे नैराश्यात असून तर अंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या, अशी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी करत मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा : ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय,’ मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?