ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 एप्रिल : देशभरात आज मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्याच्या सांगता ही मोठ्या उत्साहात ईद साजरी करत केली. दरम्यान, पाचोरा येथे देखील ईदनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सामुहिक नमाज पठणाने ईद साजरी –
पाचोरा येथील छ.शिवाजीनगर मधील ईदगाह असलेली या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. नमाज पठण झाल्यानंतर पाचोरा शहरातीलतील सामाजिक कार्यकर्ता, सर्वपक्षीय नेते-पदाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या ईद मुबारकनिमित्त शुभेच्छा दिल्या.
राजकीय नेते-पोलीस अधिकाऱ्यांकडून शुभेच्छा –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादीचे युवा नेते सनी वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगरसेवक बंडू चौधरी, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे, रईस बागवान, दीपक माने, समाधान मुळे, हारून देशमुख, आलम देशमुख, प्रवीण ब्राह्मणे, सी एन चौधरी तसेच पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरम सिंग सुंदरडे, पीएसआय योगेश गणगे, पीएसआय प्रकाश चव्हाण, पीएसआय परशुराम दळवी यांच्यासह सर्व पोलीस स्टाफ व होमगार्ड या सर्वांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.