मुंबई, 15 जुलै : राज्यात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ हे अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कालच शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर छगन भुजबळ आज सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला –
मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेटी घेतली. दरम्यान, अचानक झालेल्या या भेटीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवारांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली असल्याचे बोलले जात आहे.
काल टीका अन् आज भेट –
बारामतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आपल्या या भाषणानंतर आज भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले. दरम्यान, भुजबळ यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया –
छगन भुजबळ शरद पवार यांच्या बंगल्यावर पोहचल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्हीही अनेकदा पवार साहेबांना भेटलो आहोत. त्यामुळे छगन भुजबळ त्यांना भेटायला गेले असतील, तर त्यामध्ये काही वावग नाही. अनेक सामाजिक, राजकीय कामे असतात आणि त्यामुळे सत्ताधारी विरोधकांची किंवा विरोधक सत्ताधाऱ्यांची भेट घेत असतात. तशीच ही भुजबळ आणि पवार भेट असेल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट