• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार; मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 3, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार; मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली माहिती

मुंबई, 3 जुलै : राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या 40 किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना ‘दामिनी’ व ‘सचेत’ ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात  वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली. यासंदर्भात सदस्य समीर कुणावर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव, संतोष दानवे आणि विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –

मंत्री महाजन म्हणाले, राज्यात पावसाळी वातावरणात वीज पडून होणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका होत आहे. मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळणे आणि वादळी परिस्थिती उद्भवते, यावेळी शेतीकाम करत असताना अनेक वेळा शेतकरी वीज पडण्याच्या दुर्घटनांत बळी पडतात.


वीज पडण्याची पूर्वसूचना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचून जीवित हानी टाळता यावी, यासाठी भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (IITM) विकसित केलेली ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ ही दोन ॲप्स नागरिकांना वीज पडण्याआधीच 40 किलोमीटर परिघात सावध करणाऱ्या सूचना देतात. शासनाच्या विविध विभागांतर्फे या ॲप्सचा प्रचार व प्रसार सातत्याने केला जात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात सन 2022 मध्ये राज्यात वीज पडून 236 व्यक्तींचा, तर 2023 मध्ये 181 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी यावेळी दिली.

वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणांत आपत्ती मदतीच्या निकषांनुसार शासनाकडून आर्थिक सहाय्यही दिले जाते. 2017 नंतर वीज पडून मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 4 लाखांची मदत, गंभीर जखमी व्यक्तीस 2.5 लाखांची मदत, तर जनावरांच्या नुकसानीसाठी गाय/म्हैस/बैल यांना 37 हजार 500, मेंढी-शेळीसाठी 4000, आणि कोंबडीसाठी 100 रुपये अशी भरपाई शासनाकडून दिली जात आहे. ही मदत वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पारोळ्यात सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात; नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: lightning strikesmarathi newsminister girish mahajansuvarna khandesh livevidhansabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 3, 2026
पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page