• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

नगरपरिषद निवडणूक 2025; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 13, 2025
in पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, ताज्या बातम्या, भडगाव
नगरपरिषद निवडणूक 2025; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

पाचोरा, 13 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यात सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, नगरपरिषद तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती –

शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची स्थानिक स्वराज्य संस्था – नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर पाचोरा, भडगाव, जामनेर नगरपरिषदांसह शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना ही स्वबळावर लढेल अशी घोषणा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली. शिवसेना आणि मित्र पक्षांना संपविणे हीच भाजपची पॉलिसी असल्याचा खळबळजनक आरोपही आमदार पाटील यांनी केला होता.  दरम्यान, राज्यात महायुती असताना देखील पाचोरा-भडगावमध्ये स्वबळाची घोषणा करणारे आमदार किशोर आप्पा पाटील पहिले आमदार होते. यानंतर त्यांना आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक प्रभारी म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून वरणगाव, भुसावळ, धरणगाव आणि नशिराबाद नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आलीय. तसेच चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यावर चोपडा, फैजपुर आणि यावल नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आलीय. यासोबतच पारोळ्याचे आमदार अमोल पाटील यांची एरंडोल आणि पारोळा नगरपरिषेदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे रावेर, सावदा आणि मुक्ताईनगर नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आली. तर शिंदेंच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे अमळनेर नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : “….म्हणून मी हा निर्णय घेतला!” निर्धार मेळाव्यातून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ठ केली स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindemarathi newsmla kishor appa patilmunicipal council elections 2025suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page