• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

मोठी बातमी! पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना सीमेवर वीरमरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 9, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
मोठी बातमी! पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना सीमेवर वीरमरण

मुंबई, 9 मे : पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार केलेल्या गोळाबारात मुंबईचा जवान शहीद झालाय. मूळच्या आंध्रप्रदेश राज्यातील आणि सध्या मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास असलेल्या सैन्य दलाच्या जवानास वीरमरण आलंय. मुरली नाईक असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद –
पाकिस्तानकडून सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात असून पाक सैन्याचे रेंजर्स आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू आहेत. मात्र, पाकच्या कुरापतींना उधळून लावत असतानाच दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये मुरली नाईक यांचा समावेश असून त्यांना सीमेवर वीरमरण आलंय. आज 9 मे रोजी पहाटे 3.00 वाजता झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात मुरली नाईक यांना वीरमरण आल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांना देखील पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले.

शहीद जवान मूळचा आंध्रप्रदेशातील राहणारा –
जम्मू-काश्मीरजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान शहीद झाले. मूळचे आंध्रप्रदेश राज्यातील रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली. त्यामुळे सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे.

दरम्यान, आज मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी वाहली श्रद्धांजली –
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ‘एक्स’ पोस्ट करत करुन शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी असून देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलंय.

हेही वाचा : जम्मूच्या सांबामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा; बीएसएफची जबरदस्त कामगिरी

बातमी शेअर करा !
Share
Tags: bordermurali naikmurali naik martyredpakistani firingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

September 4, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 3, 2026
पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page