मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 15 ऑक्टोबर : चोपड्यात व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे रथोत्सवाला सोमवारी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी पूजा-अर्चा करून सुरुवात झाली. ‘बालाजी महाराज की जय, व्यंकट रमण गोविंदा’च्या जयघोषात रथोत्सवाला प्रारंभ झाला. दरम्यान, या बालाजी रथोत्सव व दुर्गादेवी विसर्जन निमित्त भारतीय जैन संघटना तर्फे सालाबादा प्रमाणे यात्रेत आलेल्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी पाणपोई (मिनरल वॉटर) ची व्यवस्था करण्यात आली होती.
या मिनरल्स पाणीपोईचे उद्घाटन येथील जैन समाजाचे अध्यक्ष गुलाबचंदजी देसर्डा यांच्या हस्ते व दादावाडी ट्रस्टचे विश्वस्त दीपक राखेचा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अनेकांनी भारतीय जैन संघटनाचे कौतुक केले. यावेळी भारतीय जैन संघटना चे अध्यक्ष निर्मल बोरा,सदस्य आदेश बरडीया,कोष्याअध्यक्ष अभय ब्रह्मेचा,मनन चोपड़ा,दर्शन देशलहरा , चेतन टाटिया,विपुल छाजेड़,संस्कार छाजेड़, कुशल बुरड, प्रेम चोपडा आदी उपस्थित होते.
यावेळी व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे रथोत्सवाच्या पूजेचे मानकरी पाटील, गढीमधील रहिवासी संग्राम देशमुख, विक्रम देशमुख, रणजीत देशमुख यांनी चक्र पूजन केले. मानकरी म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी बालाजी महाराजांचे पूजन केले.
हेही वाचा : मोठी बातमी! निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज होणार घोषणा