सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 7 मार्च : पारोळा तालुक्यातील शेतातील कृषी वीजपंप चोरीला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यानुसार पारोळा पोलिसांत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार पोलिसांनी तपास केला असता दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान, अटक केलेल्या संशयित आरोपींकडून 52 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.
नेमकं बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा पोलिस स्टेशनमध्ये शेतातील वीजपंप चोरी संदर्भात गुन्हा 4 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे, हवालदार संदीप सातपुते, अभिजीत पाटील, विजय पाटील आदींनी गुप्त माहितीच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेतला.
दरम्यान, योगेश उर्फ सूर्या रमेश पाटील (रा.शेवगे बु. ता.पारोळा), योगेश उर्फ खगेश शालिक मगर (रा. साकुर ता. मालेगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी संशयितांकडे अधिक तपास केला असता या दोघं चोरट्यानी पारोळा तालुक्यात ठीक-ठिकाणी चार कृषी कृषी पंप चोरले असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.