मुंबई, 21 मे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदान झाले. तर देशात 60.09 टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान दिंडोर लोकसभा मतदारसंघात 62.66 टक्के इतके झाले. दरम्यान, राज्यातील मतदानाची टक्केवारी ही निराशाजनक ठरलीय.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी –
लोकसभा निवडणुकीसाठी देशात पार पडलेल्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये 76.05 तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.33 टक्के झाली आहे. तसेच राज्यात सर्वाधिक मतदान दिंडोर लोकसभा मतदारसंघात 62.66 टक्के इतके झाले. तर सर्वाधिक कमी कल्याण लोकसभा मतदारसंघात 47.08 टक्के इतके मतदान झाले.
कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक जास्त मतदान –
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात 13 मतदारसंघांमध्ये मिळून एकूण 54.33 टक्के मतदान झाले. यामध्ये मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 62.65 टक्के मतदान झाले. तसेच मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी राहिली.
हेही वाचा : आज बारावीचा निकाल होणार जाहीर, दुपारी 1 वाजेनंतर ‘या’ लिंकवरून निकाल पाहता येणार