मुंबई, 2 फेब्रुवारी : अभिनेत्री पूनम पांडेच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिच्या अधिकृत इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.
पूनम पांडेचे कर्करोगाने निधन –
लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचे कर्करोगाने निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनमच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. पूनमची मॅनेजर पारुल चावला हिने एका माध्यमासोबत बोलताना पूनमच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
पूनम पांडेच्या इन्स्टापोस्टमध्ये काय लिहिलंय? –
पूनम पांडेच्या इन्स्टापोस्टमध्ये काय लिहिलंय की, “आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक असून कर्करोगाशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिले आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा, एवढी विनंती.” दरम्यान, या धक्कादायक पोस्टनंतर चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहली आहे.
मागील काही दिवसांत आली होती चर्चेत –
मागील काही आठवड्यांपूर्वी, पूनम पांडेने मालदीवचे शूट अचानक रद्द करून, तिथे पुन्हा शूट करण्यास नकार दिल्यामुळे ती चर्चेत आली होती. मालदीव तिला आवडत असले तरी ती शूटिंगसाठी जाणार नाही, असे तिने समाज माध्यमांवर स्पष्ठ केले होते. शूटिंगसाठी लक्षद्वीपचा पर्याय योग्य असल्याचेही ती यावेळी म्हणाली होती.
हेही वाचा : ‘छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर’, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?