मुंबई, 3 फेब्रुवारी : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी तिच्या ऑफिशिअल इंन्स्टाग्रामवर पोस्टवरून समोर आली होती. मात्र, आज पूनम पांडे हिने तिच्या निधनाची बातमी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाली पूनम पांडे? –
अभिनेत्री पूनम पांडेने तिच्या ऑफिशियअल इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचे शेअर करायचे आहे आणि ते म्हणजे – मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
View this post on Instagram
मी तुम्हाला इथे हेच सांगण्यासाठी आले आहे, की इतर सर्वाइकल कॅन्सर हे रोखू शकता येते. हे कॅन्सरच्या इतर प्रकारांसारखे नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त टेस्ट करावी लागेल आणि एचपीव्ही व्हॅक्सिन घ्यावी लागेल. सर्वाइकल कॅन्सरने आणखी कोणाचे प्राण जाऊ नये, म्हणून आपण एवढे आणि यापेक्षा अधिक प्रयत्न नक्कीच करू शकतो.
पूनम पांडे हिने इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांची माफीदेखील मागितली. मला माफ करा ही मी हे इतके टोकाचे पाऊल उचलले. पण त्यामुळे अचानक सर्वजण सर्वाइकल कॅन्सरविषयी चर्चा करू लागले आहेत. त्यामुळे खोटे बोलण्यामागे माझा जो उद्देश होता, तो आता पूर्ण झाला आहे”, असेही पूनम या व्हिडीओत म्हणाली.
काय होती पूनमच्या निधनाची पोस्ट? –
पूनम पांडे हिच्या इन्स्टाग्राम अकांउटवरून तिच्या निधनाची बातमी देण्यात आली होती. या पोस्टमध्ये काय लिहिण्यात आले होती की, “आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक असून कर्करोगाशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिले आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा, एवढी विनंती.”
दरम्यान, या धक्कादायक पोस्टनंतर चाहत्यांनी तिला श्रद्धांजली देखील वाहिली होती. मात्र, तिच्या या निधनाचे वृत्त हे अफवा असल्याचेही कालपासून सांगण्यात येत होते.
हेही वाचा : मोठी बातमी! भाजप आमदाराकडून गोळीबार, ठाणे जिल्ह्यात नेमंक काय घडलं?