• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

पोप फ्रान्सिस यांचं निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 21, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
पोप फ्रान्सिस यांचं निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…

पोप फ्रान्सिस यांचं निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

नवी दिल्ली – पोप फ्रान्सिस यांचं आज 21 एप्रिल रोजी निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिनल केविन फॅरेल यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचलं. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आयुष्यातली मूल्यं शिकवली. तसंच धैर्य आणि प्रेम यांचा संदेश दिला.

रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती, पण नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांची प्राणज्योत मालवली.

कार्डिनल केविन फॅरेल यांनी घोषणा केली की, “प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला आपल्या पवित्र फादर फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा अत्यंत दुःखाने करावी लागते. आज सकाळी 7.35 वाजता, रोमचे बिशप फ्रान्सिस, पित्याच्या घरी परतले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रभूच्या आणि त्यांच्या चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते.”

कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची 2013 मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटलं जातं. पोपपदी येणारे युरोपबाहेरचे ते पहिले पोप ठरले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस (फाईल फोटो)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली –

दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी म्हटले की, परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने खूप दुःख झाले. या दुःखाच्या आणि स्मरणाच्या वेळी, जागतिक कॅथोलिक समुदायाप्रती माझे मनःपूर्वक संवेदना. पोप फ्रान्सिस यांना जगभरातील लाखो लोक करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे आदर्श म्हणून नेहमी स्मरणात ठेवतील. त्यांनी तळमळीने गोरगरिबांची सेवा केली. ज्यांना दुःख होते त्यांच्यासाठी त्यांनी आशेचा आत्मा प्रज्वलित केला. मला त्यांच्यासोबतच्या माझ्या भेटींची आठवण येते आणि सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासाच्या त्यांच्या वचनबद्धतेने मला खूप प्रेरणा मिळाली. भारतातील लोकांबद्दलचा त्यांचा स्नेह सदैव जपला जाईल. त्यांच्या आत्म्याला देवाच्या मिठीत चिरशांती लाभो,’ या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: narendra modipope francis

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

July 9, 2026
गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

July 9, 2026
“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

July 8, 2026
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

July 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page