मुंबई, 13 मे : भारत-पाकच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीगचे 18 व्या हंगामातील उर्वरित सामने 9 मे पासून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, आता आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांना 17 मे पासून होणार सुरूवात होणार आहे. तसेच पुढील महिन्यात 3 जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. या शस्त्रसंधीनंतर भारत-पाकमधील तणाव काही प्रमाणात कमी झालाय. यामुळे भारतीय किक्रिटे नियामक मंडळाने आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांबाबत निर्णय घेतला असून उर्वरित सामन्यांना 17 मे रोजी होणार सुरूवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक –
- 17 मे : बंगळुरू वि. कोलकाता, बंगळुरू
- 18 मे : राजस्थान वि. पंजाब, जयपूर
- 18 मे : दिल्ली वि. गुजरात, नवी दिल्ली
- 19 मे : लखनौ वि. हैदराबाद, लखनौ
- 20 मे : चेन्नई वि. राजस्थान, नवी दिल्ली
- 21 मे : मुंबई वि. दिल्ली, मुंबई
- 22 मे : गुजरात वि. लखनौ, अहमदाबाद
- 23 मे : बंगळुरू वि. हैदराबाद, बंगळुरू
- 24 मे : पंजाब वि. दिल्ली, जयपूर
- 25 मे : गुजरात वि. चेन्नई, अहमदाबाद
- 25 मे : हैदराबाद वि. कोलकाता, नवी दिल्ली
- 26 मे : पंजाब वि. मुंबई, जयपूर
- 27 मे : लखनौ वि. बंगळुरू, लखनौ
- 29 मे : पहिला क्वालिफायर सामना
- 30 मे : एलिमिनेटर सामना
- 1 जून : दुसरा क्वालिफायर सामना
- 3 जून : अंतिम सामना