महेश पाटील, प्रतिनिधी
कन्नड, 1 जुलै : कन्नड तालुक्यातील बोरमडी(नागद) येथे आज दि. 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गावात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
कृषीदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवीदास उत्तम राठोड, सोमनाथ गणेश राठोड, राजेंद्र सुकदेव राठोड, गणेश छगन राठोड, अनिल सुपडू चव्हाण, राजेंद्र सुकदेव चव्हाण, परशुराम मदन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक यांना अभिवादन –
राज्यभरात 1 जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. तसेच ‘शेती आणि माती’वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना सर्वत्र आदरांजली अर्पण केल्या जाते. महानायक वसंतराव नाईक यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना ‘महानायक’, ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’ म्हणूनही संबोधले जाते.
हेही वाचा : मोठी बातमी! पंकजा मुंडेंसह भाजपकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर