• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

मोठी बातमी! मासिक व ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 20, 2024
in धरणगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
मोठी बातमी! मासिक व ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 20 सप्टेंबर : रावेर तालुक्यातील निंबोरा बुद्रूक येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अपात्र केल्याची कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अजून एका ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अपात्र केल्याची माहिती समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रूक येथील महिला सरपंच यांनी मासिक व ग्रामसभा न घेतल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे. कौसरबी हिलाल पटेल असे त्या महिला सरपंचाचे नाव आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रुक गावातील ग्रामपंचायतीवर सन 2021 मध्ये महिला सरपंच म्हणून कौसरबी हिलाल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार सरपंच पदावर असताना मासिक सभा व ग्रामसभा घेण्याचे अनिवार्य नियम ठरलेले आहेत. असे असताना कौसरबी पटेल यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतमध्ये मासिक व ग्रामसभा न घेतल्याची तक्रार उपसरपंच शकील वेडू पटेल आणि तायेर अब्दुल पटेल यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीचे आदेश अहवाल सादर करण्याचे सांगितले. या अहवालात कौसरबी हिलाल पटेल दोषी आढळल्याने त्यांना अपात्र करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते चौकशीचे आदेश –
तक्रारदार यांच्यातर्फे जेष्ठ वकील अ‍ॅड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. दरम्यान, अ‍ॅड. विश्वासराव भोसले यांनी याबाबत सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना सांगितले की, सदर प्रकरणातील सरपंच यांनी मासिक सभा व ग्रामसभा घेतली नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम सात व 36 च्या तरतुदीचा त्यांनी भंग केला. मासिक सभा तसेच ग्रामसभा नियमित घेणे हे सरपंच यांचे कर्तव्य असते. असे असताना त्यांनी मासिक सभा तसेच ग्रामसभा न घेतल्याने कर्तव्यात कसूर ठेवला. याप्रकरणाची तक्रार उपसरपंच शकील वेडू पटेल आणि तायेर अब्दुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. दरम्यान, धरणगाव आणि पारोळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना सखोल चौकशी करत त्यांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

मासिक व ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र –
त्यानुसार, गटविकास अधिकारी यांनी कंडारी बुद्रुक ग्रामपंचातय येथे जावून याची सखोल चौकशी करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. दरम्यान, सरपंच म्हणून पदावर काम करत असलेल्या कौसरबी हिलाल पटेल यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम सात व 36 नुसार ग्रामपंचायतीमध्ये मासिक व ग्रामसभा न घेतल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे.

हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: Dharangaon Taluka Latest Newsgram sabhaias ayush prasadkandari grampanchayatkandari grampanchayat sarpanch disqualified

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page