• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये 250 कोटींचे विभागीय क्रीडा संकुल तर ग्रामीण भागासाठी 14 लाखांचे क्रिडांगण अनुदान, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 5, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावमध्ये 250 कोटींचे विभागीय क्रीडा संकुल तर ग्रामीण भागासाठी 14 लाखांचे क्रिडांगण अनुदान, नेमकी बातमी काय?

जळगाव, 4 मे : जळगाव जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागली असून, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा जिल्ह्यातील पाच खेळाडूंना राज्यस्तरीय सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान असून, 250 कोटी रुपये खर्चून जळगावमध्ये विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागातही 14 लाख रुपये निधीतून क्रिडांगणांची उभारणी होणार असून, त्यामुळे नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटन महासंघ, व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव समारंभ 4 मे रोजी पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

गाव तिथे व्यायामशाळा व क्रीडा संकुल उभं करण्याचा शासनाचा निर्धार असून, आमदार राजूमामा भोळे यांनी मांडलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी जिल्ह्यात वाढणाऱ्या क्रीडा संस्कृतीबद्दल आनंद व्यक्त करत सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले.


पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव –
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी प्राप्त झालेले खेळाडू:

सॉफ्टबॉल – जयेश मोरे, कुमारी नेहा नितीन देशमुख, प्रीतिश रमेश पाटील
कॅरम – अभिजित त्रिपणकर, संदीप दिवे, योगेश ढोंगळे
बेसबॉल – कुमारी रेखा पूना धनगर
योग – डॉ. शरयू विसपूते (एशियन योग स्पर्धेत सुवर्णपदक)
दरम्यान, पुरस्कारप्राप्त सर्व खेळाडूंचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रातील पीएच.डी. धारकांचा सन्मान –
जिल्ह्यातील क्रीडा शिक्षण क्षेत्रात पीएच.डी. मिळवणाऱ्या 28 मान्यवर प्राध्यापक व शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

युवा पुरस्कारप्राप्त सन्मानार्थी:
जिनल जैन, मोनाली कुमावत, गोपाल दर्जी, तेजस पाटील, नरेंद्र पाटील, अनिल बाविस्कर, शुभागी फासे, अविनाश जावळे, सागर कोळी आणि विलास नारखेडे यांचा देखील गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती –
यावेळी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. राजू मामा भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, क्रिडा महासंघाचे उपाध्यक्ष नारायण खडके, श्याम कोगटा, जनता बँकेचे चेअरमन सतीश मदाने, माजी कुल सचिव संभाजी देसाई, प्रदीप तळवळकर, एजाज मलिक, महिला जिल्हा प्रमूख सरिताताई कोल्हे, अजय देशमुख, क्रिडा रसिक क्लबचे ऍड. रोहन बाहेती, योगेश मांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॉफ्ट बॉल संघटनेचे राज्य क्रीडा सचिव प्रदीप तळवेलकर यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रवींद्र नाईक (जिल्हा क्रीडा अधिकारी) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत जाधव, अरुण श्रीखंडे, विनोद माने, विनोद कुलकर्णी व अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.

हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsminister gulabrao patilshiv chhatrapati state sports awardsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page