वडशेद, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे, सर्वसामान्य माणसाचे राजे होते. महाराजांनी कायम रयतेच्या हिताचे रक्षण आणि भल्याचा विचार केला. रयतेचेही शिवाजी महाराजांवर प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते होते. कल्याणकारी निर्णयातून हा विश्वास राजेंनी निर्माण केला, असे प्रतिपादन देवाजी किसन गुंड यांनी जनजागृती सार्वजनिक वाचनालय येथील शिवजयंती कार्यक्रमात केले.
वाचनालयातील पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे, अभ्यास करावा असे आवाहन पंडित शंकर आगलावे यांनी केले. वाचनालयाच्या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा होत असल्याचे संतोष खंडू कांबळे म्हणाले. शिवजयंती समारोहाला मोठ्यासंख्येने वाचक आणि गावकरी उपस्थित होते.
यावेळी पंडित शंकर आगलावे, संतोष खंडू कांबळे, योगेश किसन गुंड, वाचनालयाचे अध्यक्ष भीमराव बाळासाहेब खंडाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव उन्मेष खंडाळे, अभिनव खंडाळे यांनी परिश्रम केले.
हेही वाचा : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले ?