• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

farmer suicide : महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2025
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
Maharashtra governments youth award-winning farmer commits suicide

महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?

बुलढाणा : आज होळी सणाच्या दिवशी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. तसेच माझ्या आत्महत्येस सरकार कारणीभूत आहे, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले.

काय आहे संपूर्ण घटना –

कैलास नागरे असे आत्महत्या केलेल्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यात घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव राजा येथील शिवनी आरमाळ भागात कायमच पाण्याची चणचण जाणवते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कैलास नागरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारले होते. यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावे, अशी नागरे यांची मागणी होती.

विशेष म्हणजे आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नागरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. मात्र, मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे अखेर कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपला जीवनप्रवास संपवला.

कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की, “आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. मात्र, तरीही पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो… स्वतः शून्य झालो.” तर राज्य सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या या शेतकऱ्यानेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Digital Arrest : केंद्र सरकारची मोठी कारवाई, डिजिटल अरेस्टमध्ये सहभागी हजारो व्हॉट्सॲप नंबर आणि स्काईप आयडी बंद

हेही वाचा – ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीच मुस्लीम नव्हतं’, मंत्री नितेश राणेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींनी यादीच दिली

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculturebuldhanacrime newsfarmer

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 10, 2026
लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 9, 2026
जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

August 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page