मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 30 ऑगस्ट : कलकत्ता डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेतील संबंधित दोषींना त्वरित फाशी द्या व बदलापूर व चोपडा, अमळनेर, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बालिकांवरील अमानुष घटनेचा आरोपीस फाशी शिक्षा देवून महाराष्ट्रातील महिला व मुली यांच्यावरील अत्याचारात सहभागी असलेल्या दोषींवर कडक कारवाई करा, अशा विविध मागण्यांचे मानव विकास पत्रकार संघ चोपडातर्फे निवेदन देण्यात आले आहे. शाळा व कॉलेजांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आलीय.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, महिला अत्याचाराच्या घटनेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून त्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी बदलापूर घटनेतील लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास व कलकत्ता येथील बलात्कार व जबर मारहाण करुन हत्या करण्यात आलेल्या घटनेतील नराधमांवर अतिजलद न्यायालयात खटला चालवून दोषीना फाशीची शिक्षा द्या. देशासह महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना त्वरीत थांबवा व महिलांची सुरक्षा बाबत उपाय योजना करा. तसेच नुकत्याच चोपडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर देखील त्वरीत कायदेशीर कारवाई करा. महिला व बालिका यांना सुरक्षितेची हमी द्या. अशा विविध मागण्यांसंदर्भात मानव विकास पत्रकार संघ चोपडा यांच्यावतीने तहसिलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी हेमकांत गायकवाड मानव विकास पत्रकार संघ जिल्हा सचिव, समाधान कोळी जिल्हा संघटक, वसीम खाटीक प्रदेश अध्यक्ष, रवींद्र कोळी राष्ट्रीय सदस्य, दिलीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेख मोहसीन शेख राऊत धुळे जिल्हा संघटक, बिलाल शेख तालुका प्रसिद्धी प्रमुख, सुनिल पावरा तालुकाध्यक्ष, रविद्र कोळी चोपडा तालुकाध्यक्ष, मिलिंद वाणी कार्याध्यक्ष, गजानन कोळी सदस्य, भिकन कोळी सदस्य, पवन कोळी सदस्य, जाकीर अली महमूद सदस्य, निजाम कुरेशी सदस्य, लीलाधर बाविस्कर सदस्य, भूषण बाविस्कर सदस्य आदी उपस्थित होते.
हेही वाचा : बदलापुरातील संतापजनक घटना, आंतरराष्ट्रीय जळगावात मानवाधिकार संघटनेचे जिल्हाधिकारी-पोलीस अधिक्षकांना निवेदन