• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 29, 2026
in धरणगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

जळगाव, 29 एप्रिल: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. नववधूला घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा धरणागाव तालुक्यातील वराड खुर्दजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पूजा रवी वाघळकर असे मृत नववधूचे नाव असून, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर अशी अन्य मृतांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं? –

प्राथमिक माहितीनुसार, गुजरातच्या वापी येथून लग्न उरकून वऱ्हाड घेऊन एक क्रूझर कार अकोल्याकडे जात होती. वाहनात एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते. अशातच धरणगाव तालुक्यातील वराड खुर्दजवळ क्रुझर वाहनाचे टायर फुटल्याने गाडीचा ताबा सुटला आणि ती थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहन पलटी झाले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश –

अपघातानंतर जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर मदतकार्य सुरू असताना, मंत्री गिरीश महाजन यांच्या वैद्यकीय सहाय्यता टीमचे आरोग्यदूत शिवाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जखमींना आवश्यक ती मदत व सहकार्य केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश उसळला.

विवाह समारंभाच्या काही तासांतच नववधूचा मृत्यू –

लग्नाचा आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची स्वप्नं घेऊन निघालेल्या या कुटुंबावर काळाने वाटेतच क्रूर झडप घातली. क्षणात सगळं काही उद्ध्वस्त झालं. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेही एकाच कुटुंबातील असल्याने दुःख अधिकच दाटून आले आहे. दुर्दैवाने विवाह समारंभाच्या काही तासांतच नववधू पूजा रवी वाघळकर हिचा मृत्यू झाला. ज्या हातांवरील मेहंदी अजूनही ताजी होती, ज्यांनी नव्या संसाराची स्वप्नं रंगवली होती, त्याच हातांना मृत्यूला कवटाळण्याची दुर्दैवी वेळ पूजावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: पाचोरा-भडगावमध्ये गेल्या 10–12 वर्षांत शेतीत सकारात्मक परिवर्तन; आता शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: dharangaon accidentjalgaon accident newsnewlywed bride diedsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page