जळगाव, 17 जून : राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. दरम्यान, आज संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी –
आज सकाळपासून शहरात कडक ऊन होते. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते.अखेर, साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, धरणगाव, पारोळा तालुक्यासह इतर ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांकडून पावसाची प्रतिक्षा केली जात असताना पावासाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज हवामान विभागाकडून (IMD) जळगावसह नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच या जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
हेही वाचा : पाचोरा येथील शहीद जवानाला अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार