• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 29, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, 28 ऑक्टोबर: जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आदिवासी जननायकांच्या कार्याचा गौरव आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी दिले. सप्ताहाच्या आयोजनात लोकसहभाग वाढविणे, लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि विविध माध्यमांतून उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही आदिवासी विकासमंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासकीय निवासस्थानी नियोजनासंदर्भात बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्यासह नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती विभागांचे अपर आयुक्त तसेच विविध जिल्ह्यांचे प्रकल्प अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

या सप्ताहांतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांशी जोडणे आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

सप्ताहाच्या नियोजनासाठी सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार सविस्तर कार्यक्रम आराखडा तयार करावा. लोकप्रतिनिधींना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमांचे नियोजन करावे. जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने पत्रकार परिषदांचे आयोजन करावे, तसेच मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांद्वारे उपक्रमांची प्रभावी प्रसिद्धी करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, न्यूक्लिअस बजेट आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची व पुतळ्यांची स्वच्छता, अभिवादन कार्यक्रम, शोभायात्रा आणि दीपोत्सव यांसारख्या उपक्रमांतून आदिवासी नायकांचे योगदान जनतेपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

वनहक्कधारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, आरोग्य तपासणी व जनजागृती उपक्रम राबविणे, तसेच कातकरी, कोलाम, माडिया आणि पारधी यांसारख्या आदिवासी समूहांपर्यंत पोहोचून जात प्रमाणपत्र, आधार नोंदणी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले. आदिवासी विकास विभाग तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे अनुभव समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करून योजनांच्या परिणामकारकतेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचेही निर्देश देण्यात आले.

हेही वाचा: ‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr ashok uikejanjatiya gaurav diwas weekmarathi newssuvarna khandesh livetribal communitytribal developmenttribal development minister

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर येथील वनरक्षक 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

रावेर येथील वनरक्षक 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

October 29, 2026
जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके

October 29, 2026
‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

October 28, 2026
VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

October 28, 2026
Chopda News: चोपड्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

Chopda News: चोपड्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

October 28, 2026
किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

October 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page