सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 16 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढला असून कडाक्याच्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान, उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात काल 15 एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पारोळा तालुक्यातील विचखेडे येथील पुनम दगडु मोरे (वय 20) हिची तब्येत बरी नसल्याने तिला जास्त प्रमाणात ताप होता. म्हणुन पुनमला तिच्या आई व बहिणेने पुढील उपचारासाठी कामी दुसऱ्या खाजगी दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुनमला पारोळ्यातील कुटीर रुग्णालय येथे घेवुन जाण्यास सांगितले.
दरम्यान, कुटीर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुनमला डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे पारोळा तालुक्यातील करंजी मुंदाणे (प्र.अ.) येथील दादाजी जगन्नाथ अहिरे यांचा उष्माघाताने चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
हेही वाचा : माहेरी असलेल्या पत्नी आणि मुलीची हत्या, नंतर स्वत:ही केली आत्महत्या, जामनेर तालुक्यतील हादरवणारी घटना