मुंबई, 30 जानेवारी : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन –
मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदन केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
अशोक सराफ यांची कारकिर्द –
अशोक सराफ यांना खरी ओळख ही मराठी चित्रपटातून मिळाली. त्यांचे काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक अशोक सम्राट म्हणू लागले होते. मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच थिएटरमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित देखील करण्यात आल आहे. विनोदी भूमिका साकारणे हा त्यांचा हातखंडच. त्यामुळेच ते बहुतांश मालिका, चित्रपट आणि नाटकात विनोदी पात्र साकारताना दिसले.
हेही वाचा : घरची परिस्थिती बेताची, आयफोनची मागणी पुर्ण झाली नाही म्हणून 20 वर्षांच्या मुलाची आत्महत्या