• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

CM Eknath Shinde in Jalgaon : “जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही”

जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2023
in जळगाव जिल्हा, खान्देश
CM Eknath Shinde in Jalgaon : “जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फाईल फोटो)

जळगाव, 16 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते जळगावातील भोकर येथील कार्यक्रमा बोलत होते.

जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पातील भोकर येथे तापी नदीवरील 150 कोटी रुपयांच्या उंच पूलाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन आणि जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी पाणी पुरवठा मंत्री व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, श्रीमती लताताई सोनवणे, माजी आमदार स्मिताताई वाघ, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह शासकीय अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी- कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजना, प्रकल्प आवश्यक आहेत. त्यांना तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर खेत पाणी, हर घर जल या योजनांवर राज्य सरकार प्रामुख्याने लक्ष देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता सरकारने राज्यातील 22 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

भोकर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर.

तसेच जळगाव जिल्ह्यातील यावल उपसा सिंचन योजनेला 100 कोटी व निम्न तापी प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पा मध्ये करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे 70 किमी वळसा वाचणार आहेत. त्यामुळे हा पूल सर्वाना वरदान ठरणारा आहेत. हर घर नल, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावात कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अमरावतीच्या धर्तीवर जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात येईल.

तसेच मुक्ताईनगरी, धरणगाव, चोपडा, पाचोरा, एरडोल येथे एमआयडीसी सुरु करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात वारकरी भवन व लोककला भवन उभारण्यासाठी सकारात्मक विचार करु शिवाय जिल्ह्यातील वाहतुकीसाठी 100 बसेस, पाळधी येथे बालकवी ठोंबरे स्मारक, बहिणाबाई चौधरी स्मारक, धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व नशीराबाद येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत आणि केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले –

पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाचे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. जलजीवन मिशन अतंर्गत राज्यातील 38 हजार गावांमध्ये कामे सुरू आहेत. या कामांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येत आहे. केळीचा पोषण आहरात समावेश करावा. केळी प्रक्रिया उद्योग सुरु करावा. टोकरेकोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, कापसाला हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. जळगावात मेडिकल हबचे काम सुरू होत आहे. ग्रामविकास विभगााच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाडळसे प्रकल्पाचा बळीराजा योजनेत समावेश करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

* भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी)

* शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी. * मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख.

* म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी.

* जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपूजन- रु. 42 कोटी.

* बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी.

* धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी.

* जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

* धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm eknath shindecm eknath shinde in jalgaoncm jalgaon newsjalgaon development projectsjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

June 5, 2026
भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

June 5, 2026
Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

June 4, 2026
विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

June 4, 2026
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

June 4, 2026
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अन्न व प्रशासन विभागात कारवाईचा धडाका; पान मसाला, गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ₹1.58 कोटींचा साठा जप्त

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अन्न व प्रशासन विभागात कारवाईचा धडाका; पान मसाला, गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ₹1.58 कोटींचा साठा जप्त

June 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page