• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon Crime : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसांसह दोन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon Crime : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसांसह दोन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, 5 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, ता. बडवाणी, म.प्र.) आणि पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा 1 लाख 29 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कशी झाली कारवाई? –

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठा करून काही इसम दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, वरणगाव शहरातील फुलगाव ब्रिज परिसरात दोन संशयित गावठी कट्ट्यासह येणार आहेत.

यानुसार पथकाने तातडीने सापळा रचला असता काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर दोन इसम संशयास्पदरीत्या दिसून आले. चौकशीअंती त्यांची नावे चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, ता. बडवाणी, म.प्र.) आणि पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी समोर आली.

शस्त्रास्त्रांसह मुद्देमाल जप्त –

त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, काळ्या-लाल रंगाची पल्सर मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा अंदाजे 1 लाख 29 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परवानगीशिवाय शस्त्रे बाळगल्याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला CCTNS क्र. 194/2025, आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाची कामगिरी –

ही कारवाई उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कर्मचारी यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रिंतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे आणि चापोह भरत पाटील यांनी केली. संपूर्ण कारवाईसाठी मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक) तसेच राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : Jalgaon Crime : मोटारसायकल चोरी प्रकरणी एक आरोपी अटकेत; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsjalgaon crimejalgaon lcbjalgaon policemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

June 24, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण; आई गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ चांदीचा रथ पालखी सोहळ्यास भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण; आई गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ चांदीचा रथ पालखी सोहळ्यास भेट

June 24, 2026
एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे

June 24, 2026
बळीराजाला दिलासा! जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; आजचा हवामान अंदाज काय?

बळीराजाला दिलासा! जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; आजचा हवामान अंदाज काय?

June 24, 2026
ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

June 23, 2026
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात मोठी घोषणा

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात मोठी घोषणा

June 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page