• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2026
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

​चोपडा, 14 फेब्रुवारी: चोपडा येथील ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय च्या वतीने प्रथमच २१,१११ कच्च्या केळ्यांपासून १८ फूट उंच भव्य महाशिवलिंग साकारले आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, चोपडा यांनी आपल्यासाठी एक अभूतपूर्व अशी आध्यात्मिक पर्वणीच घेऊन आलेले आहे.

महाशिवरात्रीचे पावन पर्व म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव. याच औचित्याने चोपडा शहरात यंदा प्रथमच एक अत्यंत आगळावेगळा आणि विलोभनीय उपक्रम त्यांनी साकारला आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, चोपडा यांच्या वतीने चक्क १८ फूट उंच आणि २१,१११ कच्च्या केळ्यांपासून भव्य ‘महाशिवलिंग’ साकारण्यात आले आहे. हे शिवलिंग सध्या संपूर्ण परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरत असून भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवलिंगाचे भव्य स्वरूप –

महाशिवरात्री पर्व ​केवळ धार्मिक विधी न राहता, अध्यात्म आणि सृजनशीलता यांचा संगम या उपक्रमात दिसून येत असतो. तब्बल १८ फूट उंचीचे हे शिवलिंग पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

​केळ्यांची सजावट –

महाशिवलंग उभारण्यासाठी एकूण २१,१११ कच्च्या केळ्यांचा वापर करण्याता आला असून हे शिवलिंग अत्यंत सुबकपणे मढवण्यात आले आहे. सदर ​पर्यावरणपूरक आणि भव्य दिव्य अशा या महाशिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी चोपडा शहरासह तालुक्यातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. दर्शनाचे नियोजन  ब्रह्माकुमारीज, चोपडा यांनी केले आहे. केवळ दर्शनच नव्हे, तर मानवी जीवनात आत्मचिंतन, संयम आणि पवित्रता यावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी –

​महाशिवलिंगासोबतच येथे एक आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी देखील भरवण्यात आली आहे. या माध्यमातून ‘शिवतत्त्व’, ‘आत्मा-परमात्मा नाते’ आणि ‘सदाचारयुक्त जीवन’ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा संदेश या प्रदर्शनातून दिला जाईल.

​”हा उपक्रम भाविकांसाठी केवळ दर्शनाचा विषय नसून तो आध्यात्मिक ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे. नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून या दिव्य दर्शनाचा आणि संदेशाचा लाभ घ्यावा.” असे आवाहन आयोजक, ब्रह्माकुमारीज, चोपडा यांनी केले आहे.

हेही वाचा : VIDEO | “…..तर मी राजीनामा देईन!”, मंत्रालयात क्लर्कने लाच घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांची मोठी प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda mahashivlingchopda newsmahashivratrimahashivratri 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

April 3, 2026
पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

April 3, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page