• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुक्यातील लासूर येथे 2 ते 11 मेदरम्यान मोफत वारकरी बाल सुसंस्कार शिबिर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 26, 2026
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील लासूर येथे 2 ते 11 मेदरम्यान मोफत वारकरी बाल सुसंस्कार शिबिर

चोपडा, 26 एप्रिल: चोपडा तालुक्यातील श्री क्षेत्र लासूर येथे मुलांच्या आध्यात्मिक व सर्वांगीण विकासासाठी २ मे ते ११ मे २०२६ दरम्यान निःशुल्क वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या व तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीमुळे मुलांमधील संस्कारांचे महत्त्व कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे.

राष्ट्रीय कथाकार महंत प्रा. हभप डॉ. सुशिलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, लासूर यांच्या पुढाकारातून आयोजित निवासी शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे.

शिबिरामध्ये श्रीमद्भगवद्गीता, हरिपाठ, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम, हनुमान चालीसा यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करण्यात येणार असून पखवाज वादन, गायन, कीर्तन प्रशिक्षण तसेच वारकरी पावल्यांचे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय योगासने व व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दररोज दुपारी विद्यार्थ्यांचे कीर्तन सादरीकरण होणार असून रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत विविध कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. २ मे रोजी हभप नरेश महाराज अंमळनेरकर, ३ मे रोजी हभप हरीश महाराज वडगावकर, ४ मे रोजी हभप बाळासाहेब महाराज अनवर्देकर, ५ मे रोजी हभप पवन महाराज लासूरकर, ६ मे रोजी हभप धीरज महाराज रुंधाटीकर, ७ मे रोजी हभप गौरव महाराज वाळकीकर, ८ मे रोजी हभप राहुल महाराज दोनगावकर, ९ मे रोजी हभप सोहम महाराज लासूरकर, १० मे रोजी हभप राज महाराज कंचनपूर यांचे कीर्तन होणार असून ११ मे रोजी महंत प्रा. डॉ. सुशिलजी महाराज यांच्या काल्याच्या व परंपरेच्या गुलाल कीर्तनाने शिबिराची सांगता होईल.

शिबिराच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. ५ वर्षांवरील मुलांसाठी खुले असलेल्या या शिबिरात वारकरी पोशाख बंधनकारक असून मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अध्यात्मिक शिक्षण घेता येईल.

लासूर येथील श्रीराम मंदिरात होणाऱ्या या निवासी शिबिरात दरवर्षी सुमारे २०० विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, शिबिरादरम्यान विद्यार्थी गावातून मधुकरी मागून त्याच अन्नाचे सेवन करतात. समाजात सुसंस्कारित व चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून पालकांनी आपल्या पाल्यांना शिबिरात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: balsanskar shibirchopda newssuvarna khandesh livewarkari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 26, 2026
“गोदा ते नर्मदा” जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना

“गोदा ते नर्मदा” जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना

April 26, 2026
चोपडा तालुक्यातील लासूर येथे 2 ते 11 मेदरम्यान मोफत वारकरी बाल सुसंस्कार शिबिर

चोपडा तालुक्यातील लासूर येथे 2 ते 11 मेदरम्यान मोफत वारकरी बाल सुसंस्कार शिबिर

April 26, 2026
जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

April 25, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

April 25, 2026
जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

April 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page