• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“…..तर सरकारची मदत मिळणे अवघड,” ई- पिक पाहणी संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 2, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
“…..तर सरकारची मदत मिळणे अवघड,” ई- पिक पाहणी संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

जळगाव, 2 ऑगस्ट : आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या वर्षी ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. कारण, सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई- पीक पाहणी बंधनकारक केली आहे. 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.

ई- पीक पाहणी सुरूवात –
यंदा देखील ई-पीक पाहणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना अ‍ॅपवर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी अ‍ॅपद्वारे खरिपातील पिकांची नोंद करून घ्यावी. राज्य शासनाकडून 2021 पासून ई- पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे.
या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंद अ‍ॅपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलीय. योजना सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी या योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता. मात्र, नंतरच्या दोन वर्षानंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती झाल्यामुळे ई- पीक पाहणीला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा –
जळगाव जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून ई-पीक पाहणीसाठी नोंदणी सुरू करण्यात आलीय. सरकारद्वारे विकसित करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकरी शेतातील पिकांची नोंद करू शकतील. यानंतर तलाठी व कृषी सहायकांच्या स्तरावर नोंदणी करता येणार आहे. यासाठी 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असणार आहे.

ई-पीक पाहणीचे महत्व –
सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येते. परंतु, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केली आहे, अशाच शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच विमा कंपन्यांकडून देखील ई- पीक पाहणीचा अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येत असते. यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई-पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरवण्यात येत असते.

दरम्यान, शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे नोंदणी करता येईल. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक असून त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

हेही वाचा : जळगावच्या सिमेंट व्यापाऱ्याने सरकारला चुना लावत साडेबारा कोटींची केली फसवणूक, नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: e-pick inspectionias ayush prasadjalgaon livesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

April 29, 2026
चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

April 29, 2026
‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

April 29, 2026
मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

April 29, 2026
धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

April 29, 2026
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

April 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page