• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पाचोरा तालुक्यातील एकाचा समावेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 20, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या, पाचोरा, रावेर
जळगाव जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पाचोरा तालुक्यातील एकाचा समावेश

जळगाव, 20 जुलै : जळगाव जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करत चार जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच आदेश जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल 19 जुलै रोजी दिले.

एकाची ठाणे कारागृहात रवानगी –
तसेच जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील किरण श्रावण कोळी (वय 28) या आरोपीलाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच त्याची ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रस्ताव तयार केला होता.

एमपीडीए अंतर्गत कारवाई –
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाणे हद्दीतील मनोहर उर्फ मोहन उखडू कोळी (55, रा. लोहारी, ता. पाचोरा) तसेच रावेर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या शेख तोसिफ शेख अफजल (28, रा. रावेर), अयुब बशीर तडवी (55, रा. कुसुंबा, ता. रावेर), मगन मुरलीधर करवले (43, रा. अटवाडे, ता. रावेर) या चौघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या चौघं गुन्हेगारांची मुंबई व ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

भोलाणे येथील एकाची ठाणे कारागृहात रवानगी –
जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील किरण श्रावण कोळी याच्याविरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने , दि. 23 जानेवारी 2022 ते 5 मार्च 2023 दरम्यान पाच कारवाया केल्या आहेत. ‘हातभट्टी’ची दारू पाडणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या या आरोपीची पाच पैकी दोन गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता झाली आहे. अन् ती गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. तसेच या आरोपीवर दोनदा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. या आरोपीकडून सातत्याने हातभट्टीची दारू विक्री होत असल्याने आणि कारवाई करूनही आळा बसत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी गंभीर दखल घेतली आणि एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 18 जुलै रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आरोपीला ताब्यात घेतले आणि ठाणे कारागृहात त्याची रवानगी केली आहे.

काय आहे हा एमपीडीए कायदा? –
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायदा करण्यात आला. यामध्ये आरोपीला एका वर्षासाठी तत्काळ स्थानबध्द (तुरूंगवास) करण्यात येते. तसेच याविरोधात केवळ उच्च न्यायालय व मंत्रालयात दाद मागता येते.

हेही वाचा : ‘आता माघार नाही, उद्यापासून उपोषण’, मनोज जरांगेंची पत्रकार परिषदेत घोषणा

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsjalgaon district latest newsjalgaon policempdampda act

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page