• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

मोठी बातमी! अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं; लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणातच अपघात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
मोठी बातमी! अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं; लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणातच अपघात

अहमदाबाद, 12 जून : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगरमधील रहिवासी परिसरात 700 फूटांवरून खाली प्रवासी विमान कोसळले असून या विमानात दोन पायलटसह 10 क्रूमेंबर्स तसेच 232 प्रवासी असल्याचे समजते. टेक ऑफनंतर अवघ्या काही क्षणातच एका इमारतीवर हे विमान क्रॅश झाले. विमानाची जबाबदारी सुमित सबरवाल, फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदल यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत जीवितहानीबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे Boeing Dreamliner 171 विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.38 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान खाली कोसळले. या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रमाणात कुलिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. तसेच एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे असून विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

विमान प्रवासात गुजरातचे माजी मुख्यमंत्री –

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळले. अहमदाबादध्ये कोसळलेल्या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील यांना फोन करुन माहिती घेतली. तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.

दुर्घटनास्थळी मोठा स्फोट –

अहमदाबाद येथील विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ज्याठिकाणी प्लेन क्रॅश झाले त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. तसेच घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला. विमान अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता समोर आलेली नसून प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तिघांचा मृत्यू, 21 घरांचे नुकसान, पंचनामे सुरू

बातमी शेअर करा !
Share
Tags: air indiaair india boeing dreamlinerair india plane crashair india plane crash in ahemadnagarmarathi newsplane crashsuvarna khandesh live latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 10, 2026
लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 9, 2026
जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

August 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page