• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

धुळ्याचे ZP CEO विशाल नरवाडे ठरले राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते यांचा गौरव

100 दिवसांचा कृति आराखडा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 28, 2025
in धुळे, ताज्या बातम्या
Dhule ZP CEO Vishal Narwade was awarded the best CEO in the state felicitated by Chief Minister Devendra Fadnavis

धुळ्याचे ZP CEO विशाल नरवाडे ठरले राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते यांचा गौरव

धुळे, 27 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात 100 दिवसांचा कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. या 100 दिवस कृती आराखड्याची धुळे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या आराखड्यातंर्गत राबविलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून याबद्दल त्यांचा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत आज पार पडली.

यावेळी राज्यातील 15 विविध विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदांमध्ये या आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद गटात सादरीकरणाची संधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मिळाली. श्री. नरवाडे यांनी केलेल्या कामकाजाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने ते राजयातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या सादरीकरणात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाबरोबरच विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ तयार करण्यात धुळे जिल्हा परिषद राज्यात चौथ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या 7 सेवा ऑनलाईन प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सुकर जीवनमान अतंर्गत सेवांचीर पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात राहणीमान सुलभ करण्यासाठी 9 उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यालयीन स्वच्छता उपक्रमातंर्गत स्वच्छतेची पंचसुत्री तयार करण्यात येऊन जुन्या निरुपयोगी वस्तुंची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तक्रार निवारण उपक्रमातंर्गत आपले सरकार पोर्टलवरील 349 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. अभ्यागत भेटीचे नियोजन, नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर कार्यालयीन सोईसुविधा उपक्रमातंर्गत कार्यालयाच्या आवारात स्वच्छ पिणयचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह, सुसज्ज प्रतिक्षालय, प्रथमोपचार पेटी, दिव्यांग अभ्यागतांसाठी व्हीलचेअर, कार्यालयाचे सौंर्दयीकरण करण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांना भेटी उपक्रमातंर्गत आठवड्यातून किमान 2 दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजात 1 जानेवारीपासून ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कामकाजास गती आली आहे. आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन उपक्रमातंर्गत उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, नोंदणी, कर भरण्याची सुलभता पध्दत सोपी करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी व कृत्रिम बुध्दीमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे.

याशिवाय नाविण्यपूर्ण उपक्रमात घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने काम पूर्णत्वास गती आली आहे. शिवाय कॉपी मुक्त अभियानाचा धुळे पॅटर्न राज्यभरात नावारुपास येत असून या उपक्रमाचे शिक्षणमंत्री, मुख्य सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनीही कौतुक केले आहे.

या विविध उपक्रमांसोबतच पुढील उर्वरित दिवसांचे उत्कृष्ट नियोजन आदिंचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण श्री. नरवाडे यांनी आज सादर केल्याने ते उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा – Jalgaon DM Ayush Prasad : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने रचला नवा विक्रम, महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक!

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdhuledhule zilla parishaddhule zilla parishad ceodhule zilla parishad newsdhule zp ceo vishal narwadeias vishal narwade dhule

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page