• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तोंडात तंबाखू देऊन बापानेच केली 8 दिवसांच्या मुलीची हत्या, जामनेर तालुक्यातील संतापजनक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 13, 2023
in जामनेर, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
तोंडात तंबाखू देऊन बापानेच केली 8 दिवसांच्या मुलीची हत्या, जामनेर तालुक्यातील संतापजनक घटना

घटनास्थळाचे दृश्य

जामनेर (जळगाव), 13 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी भडगाव तालुक्यात एका चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला होता. ही घटना ताजी असतानाच आता जळगाव जिल्ह्यातून आणखी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. तोंडात तंबाखू देवून बापानेच आपल्या स्वत:च्या आठ दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे. जामनेर तालुक्यातील हरिअर तांडा याठिकाणी ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं –
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक संतापजनक घटना घडली. जामनेर तालुक्यातील हरिहर तांडा या गावातील व्यक्तीला आधी दोन मुली होत्या. त्यानंतर तिसरीही मुलगी जन्माला आल्याने त्याने आपल्या या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केली. तसेच आठ दिवसांच्या या मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित बापाला पोलिसांनी अटक केली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (30) असे या बापाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

चिमुकलीच्या मृतदेहाची लावली विल्टेवाट –
जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवारी 2 सप्टेंबरला वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला तिसरे अपत्य म्हणून मुलगी जन्माला आली. मात्र, गोकुळने रविवारी या नवजात जन्माला आलेल्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली आणि तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. तसेच रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावली.

अशी आली घटना समोर –
मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर दहा दिवसापर्यंत चिमुरडीच्या बापाने या घटनेची कुणालाही माहिती मिळू दिली नाही. आशा सेविका जन्माची नोंद घेण्यासाठी घरी गेल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलीस अधीक्षक काय म्हणाले –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी याबाबत माहिती दिली की, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संशयित बापाला अटक केली आहे. आज फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून घटनास्थळी भेट देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी बापाने चिमुरडीचा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती, त्याठिकाणाहून मृतदेह हा ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

आरोपीने दिली कबुली –
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची तातडीने गंभीर दखल घेत, गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे, आधीच दोन मुली आणि त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून त्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिचा जीव घेतल्याची कबुली आरोपी पिता गोकुळ जाधव याने दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsjalgaon crimejamner crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

May 15, 2026
महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

May 15, 2026
सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page