• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या परिक्षेत यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; पालकमंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या परिक्षेत यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; पालकमंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला

जळगाव, 16 मे : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
जिल्हा परिषदेतर्फे आयोजित या गौरव समारंभात पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उंच भरारी घ्या, पण पाय जमिनीवर ठेवा. यशाच्या शिखरावर पोहोचताना नम्रता हीच खरी साथ देणारी असते. WhatsAppवर वेळ दवडू नका, ‘What’s next’ याचा विचार करा. दरम्यान, विद्या ही केवळ गुणांपुरती मर्यादित न ठेवता ती विचारात, कृतीत आणि वागण्यात उतरवली पाहिजे, असा सल्लाही पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाला आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शिक्षणाधिकारी, विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना महात्मा गांधींची मूर्ती, सुताचा हार व अभिनंदनपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


गुणवंतांचा गौरव –
दहावी परीक्षेतील गुणवंतांमध्ये महाराष्ट्र मंडळातून प्रसन्न हिम्मत चौधरी (100%), जेनिशा गेही (99.60%), वेदिका क्षत्रिय (99.40%), रोहन संदीप पाटील (99.00%), पूर्व पाटील व चैताली पाटील (98.80%) यांचा समावेश आहे.

बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत अदिती सोनार (92.67%), कला शाखेत अख्तर बेग मिझ (91.33%), वाणिज्य शाखेत अभिषेक जैन (97.33%) हे विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली. सीबीएसई बोर्डातून मानसी वायकोळे (99.40%), तनिष्का अग्रवाल (98.80%) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.

गौरव समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना...
गौरव समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना…

आदिवासी गटातील गंगावती वळवी (90.40%), अनुसूचित जाती-जमातीतील पियुष जाधव (79.20%), तसेच अनाथाश्रमातील वैशाली हिवराळे व दामिनी महाजन या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांशी संवाद –
पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “पुढे काय होणार?” असा प्रश्न विचारला असता, बहुतेकांनी डॉक्टर, इंजिनीयर होण्याची इच्छा व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचा संकल्प बोलून दाखवला. मात्र, राजकीय क्षेत्रात येण्याची तयारी फार कमी असल्याचे दिसून आले. त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितले, “राजकारणात हुशार तरुणांची गरज आहे. तुम्ही पुढे आलात, तर समाज बदलू शकतो.” त्यावर एका विद्यार्थ्याने राजकारणात येण्याची उत्सुकता व्यक्त केली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना बोलतं केलं. त्यावेळी विद्यार्थ्यांनी दहावीनंतर पालकांचा ओढा कॉलेजपेक्षा क्लासेसकडे अधिक असतो, याकडे लक्ष वेधून हा कल थांबवण्याची गरज व्यक्त केली. पालकमंत्र्यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत शासन स्तरावर यासंदर्भात चिंतन सुरू असल्याचे सांगितले.

गौरव समारंभाचा उद्देश –
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होणे व पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळणे, हा जिल्हा परिषदेमार्फत आयोजिलेल्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समारंभाच्या समाप्तीनंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा : मंत्री गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान; म्हणाले, “तुम्ही फक्त कोथळी…”

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector officegulabrao patil latest newsjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

September 19, 2026
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page