• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 31, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव, 30 जुलै: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत घेतलेल्या कृषी पीक कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसीसह आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केले.

या योजनेनुसार दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत उर्वरित कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ८७ हजार ८२६ कर्जखाती पात्र असून त्यापैकी ६५ हजार ३४३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५३ हजार ८९६ तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या ११ हजार ४४७ कर्जखात्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ हजार ५०४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून २८ हजार ८३९ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. प्रसिद्ध झालेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी, सेतू सुविधा केंद्र किंवा आधार केंद्रावर जाऊन कर्जखात्याची माहिती पडताळून ई-केवायसी पूर्ण करावी.

लाभ मिळण्यासाठी कर्जखाते आधार प्रमाणित असणे तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण नसेल, तरी ती तातडीने करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कर्जखात्यातील माहितीबाबत तक्रार, मयत शेतकऱ्यांच्या वारसांची प्रकरणे किंवा जमीन विक्रीनंतर उद्भवलेल्या अडचणींचे निराकरण तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांमार्फत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या महसूल अधिकारी, तलाठी, तहसील कार्यालय किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधून कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: पाचोरा-भडगाव मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

बातमी शेअर करा !
Share
Tags: e-kycjalgaon dm rohan ghugemarathi newspunyashlok ahilyadevi holkar farm loan waiver schemeshetakari karjmafisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page