• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नव्याने देण्यात येणाऱ्या बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य; मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा नेमका निर्णय काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 3, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
नव्याने देण्यात येणाऱ्या बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य; मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा नेमका निर्णय काय?

जळगाव, 3 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील वाढते तापमान, पर्यायाने पर्यावरणात होणारे बदल, वाढते कॉंक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट दिसत आहे. भूजल पातळीत झपाट्याने होणारी घट हा चिंतेचा विषय बनला असून होणारी घट भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने ” मिशन संजीवनी” हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच आता जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रत्येक मंजुरी आदेशात ” रेन वॉटर हार्वेस्टिंग” करणे हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान –
जळगाव जिल्ह्यात देखील दरवर्षी उन्हाळ्यात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई सारख्या भिषण समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो तर अनेक ठिकाणी विहिरी अधिकृत करून देखील पाण्याची मोठी समस्या जाणवते यावर मात करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने “मिशन संजीवनी” अभिनव संकल्पना अमलात आणण्याचे निश्चित केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा निर्णय –
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून” मिशन संजीवनी”ची मुहूर्त मेढ होणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांकडून ग्रामीण भागात विविध विकास योजनांद्वारे लोकपयोगी इमारतींचे बांधकाम होत असते यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, शाळा इमारत खोली बांधकाम, समाज मंदिरांचे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, सभागृह, सभा मंडप यासारखे विविध बांधकाम करण्यात येतात. यासारख्या कामांना मंजुरी देताना किंवा प्रशासकीय मान्यता देताना सदर मंजुरी आदेशात संबंधित इमारतीचे बांधकाम करण्याचा मक्ता जो मक्तेदार घेईल त्यांना शतावर पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करण्याचे काम स्वखर्चाने करून देणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भातील स्पष्ट बांधकाम मंजुरी आदेशात टाकण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी दिले आहेत.

रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य –
रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बांधकामाच्या ठिकाणी मक्तेदाराने रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम न केल्यास बांधकाम पूर्णत्वाची नोंद प्रशासकीय दप्तरी घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पुरावे छायाचित्र स्वरूपात देयकासोबत जोडण्यात यावे तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्याची खात्री करूनच देयक पारित करावे असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

भूजल पातळीत वाढ वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल –
यासोबतच ग्रामपंचायत स्तरावरील निधीतून मंजुरी देण्यात येणाऱ्या इमारत बांधकामांना देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग 1 एप्रिल 2025 नंतरच्या मंजुरी देण्यात येणाऱ्या ग्रामविकास विभागाच्या नियंत्रणातील प्रत्येक बांधकामास सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या या अभिनव अभियानामुळे जिल्हाभरातील भूजल पातळीत वाढ होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी!, SEIAA च्या बैठकीत वाळू उत्खननाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias minal karanwaljalgaon zp ceorain water harvestingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page